रवीना टंडनचा लूक पाहून चाहते झाले फिदा

Siddhi Naringrekar

रवीना टंडन ही ९० च्या दशकातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.

बॉलिवूडची ही स्टार अभिनेत्री आजही आपल्या सौंदर्याने इतर अभिनेत्रींना मागे टाकते.

रवीना टंडन इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत लेटेस्ट फोटो शेअर करत असते.

यावेळी देखील रवीना टंडनने तिच्या फोटोशूटद्वारे चाहत्यांना खिळवून ठेवले आहे.

नुकतेच रवीनाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमधील रवीनाचा लूक पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.

या फोटोंमध्ये रवीना टंडनने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. 47 वर्षीय रवीना टंडन या ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत आहे.