shweta walge
वयाच्या 68 व्या वर्षी रेखा आजही तिच्या सौंदर्य आणि उत्कृष्ट शैलीने इंडस्ट्रीतील अभिनेत्रींना टक्कर देते.
रेखा प्रत्येक वेळी तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ करते. अशातच पुन्हा एकदा रेखा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे.
रेखाने नुकतेच एका मासिकासाठी अतिशय ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रेखाने वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट बघूनच तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. सिंदूर, गडद रंगाची लिपस्टिक आणि सोनेरी बनारसी साडीमध्ये ती अप्रतीम दिसत आहे.
रेखाने तिच्या गळ्यात खूप जड हिऱ्याचे दागिने घातलेले दिसत आहे. त्याचवेळी, इतर फोटोमध्ये तीचा लूक उमराव जानसारखा दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये रेखा इतकी सुंदर दिसत आहे की तिच्या चेहऱ्यावरून डोळे काढणे कठीण आहे.
वोग मॅगझिनच्या या फोटोशूटमध्ये एव्हरग्रीन रेखा एक नाही तर 6 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्याची खास स्टाइल प्रत्येक चित्रात पाहायला मिळत आहे.
या फोटोशूटमध्ये रेखाने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान केले आहेत. या फोटोंमध्ये रेखा भारतीय शैलीतील गोल्डन कलेक्शनमध्ये दिसत आहे.