Rohit Sharma : हिटमॅन रोहित शर्माबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

shamal ghanekar

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. रोहित शर्माला हिटमॅन (Hitman) म्हणूनही ओळखला जाते. रोहित शर्मा महाराष्ट्रीयन असला तरी त्याला हिंदी, इंग्लिश, तेलुगु आणि मराठी या भाषा येतात.

Rohit Sharma

बंगलोर येथे 2 नोव्हेंबर 2013 ला झालेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये रोहित शर्माने 209 धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले होते. त्यानंतर रोहितने 13 नोव्हेंबर 2014 च्या एकदिवसीय श्रीलंकेविरूद्ध (Sri Lanka) विश्वविक्रमी 264 धावा केल्या होत्या. आणि सर्वाधिक धावाचा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

Rohit Sharma

रोहित शर्माने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यामध्ये (one day series) तीन द्विशतके लगावली आहेत.

Rohit Sharma

तसेच टी20 मध्ये 6 शतक रोहित शर्माच्या नावावर आहेत. 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध टी२० (T20) मध्ये ३३ बॉल मध्ये जलद शतक करणारा तो जगात दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

Rohit Sharma

तसेच रोहित शर्मा हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियनचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई (Mumbai) संघाने 5 वेळा इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) कप जिंकला आहे. नावावर आयपीयलमध्ये हँट्रिक आहे .

Rohit Sharma