'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री एलनाज नोरोजीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Team Lokshahi

प्रसिद्ध वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' मधील अभिनयामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री एलनाज नोरोजी सध्या तिच्या फोटोशुट मुळे चर्चेत आहे

इराणी वंशाची अभिनेत्री-मॉडेल एलनाज नोरोझी ही बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. मात्र, ती अजूनही संयम राखत मोठा ब्रेक मिळण्याची वाट पाहत आहे.

पंजाबी चित्रपट आणि संगीत व्हिडिओंमध्ये नशीब आजमावण्यापूर्वी, तिने 2018 च्या वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' मध्ये एक छोटी परंतु उल्लेखनीय भूमिका करून सर्वांना प्रभावित केले.

तिच्या एका फोटोमध्ये एलनाजने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि मॅचिंग हाय बूट घातले आहेत, ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे.

अलीकडे एलनाज चांगुलपणामुळे चर्चेत आहे. नुकतेच एलनाज नोरोजी हिने गरीब आणि गरजू मुलांमध्ये कपड्यांचे वाटप केले होते.

एलनाज नौरोझी चे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. एलनाजच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

ती नुकतीच 'खिडो खुंडी' या पंजाबी चित्रपटात दिसली आहे. याआधी तिने दुसऱ्या वेब सीरिज 'अभय'मध्ये काम केले होते.

एलनाज नौरोझी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावर ती दररोज तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.