shamal ghanekar
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) तिचे साडीमधले लुक शेअर करत असते.
सध्या सई लोकूरच्या नव्या लूकची खूप चर्चा होताना दिसत आहे. यावेळी सईने पारंपरिक नऊवारी साडी परिधान केली आहे. सईचा मराठमोळा लूक पाहून चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा (Comments) वर्षाव केला आहे.
हा लूक पुर्ण करण्यासाठी त्याला साजेसे पारंपरिक दागिने सुद्धा सईने परिधान केले आहेत.
नऊवारी साडी, चंद्रकोर, डोक्यात गजरा असा अस्सल मराठी लुकमध्ये सई खूपचं सुंदर दिसत आहे.
या खास लुकमध्ये सईने रील सुद्धा तिने सोशल मिडियावर शेअर केलं आहे.
या फोटोंमध्ये दिसत आहे की, तिने गुलाबी रंगाचा सुट परिधान केला आहे. या फोटोला तिने मुंबई की ना दिल्लीवालों की पिंकी है पैसेवालों की, असे कॅप्शन दिलं आहे.
सई अभिनयासोबत एक यशस्वी उद्योजिका आहे. सई स्वतःचा ज्वेलरी ब्रँड चालवते. या ज्वेलरी ब्रँडचं नाव ‘सांज बाय सई’ असं आहे.