कियाराच्या पिंक लूकवर सिध्दार्थ मल्होत्रा फिदा; म्हणाला, मुझेभी रंग दो

Shweta Shigvan-Kavankar

लग्नानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी पुन्हा कामाला लागली आहे.

अलीकडेच ती डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करताना दिसली. यात तिच्या लूकने सर्वांची मने जिंकली.

कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर महिला प्रीमियर लीगमधील काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती गुलाबी रंगाच्या शिमरी जंपसूटमध्ये दिसत आहे.

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून तिने हा पोशाख निवडला आहे.

तर कियाराने या जंपसूटसोबत सिल्व्हर कलरचे बूट आणि इअररिंग्स घातल्या आहेत.

तिने न्यूड मेकअप व डोळ्यांवर क्रिस्टल्स लावत आपला लूक पूर्ण केला आहे.

कियाराच्या या फोटोवर चाहतेच नाही तर तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्रा देखील फिदा झाला आहे.

कियाराने तिचे फोटो शेअर करताच सिद्धार्थ मल्होत्राने 'पेंट मी पिंक' अशी कमेंट केली.