ड्रामॅटीक गाऊनमध्ये सोनम कपूरचा रेड कार्पेटवर जलवा

Shweta Shigvan-Kavankar

नुकतीच आई झालेली सोनम कपूर पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त लुकसह रेड कार्पेटवर परतली आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'साठी केलेल्या अप्रतिम लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

तिने सारा म्राडचा एक स्ट्रक्चर्ड, ड्रामॅटीक पिवळा रंगाचा गाऊन परिधान केला होता. ड्रामॅटीक नेकलाइनसह ऑफ शोल्डर गाऊन तिने घातला होता.

यासोबतच स्लीक बन, ड्रॉप इअरिंग्ज आणि ग्लॅम मेकअपसह लूक तिने केला होता.

यामध्ये सोनम खूपच सुंदर दिसत होती.

सोनम कपूर आणखी एका ड्रामॅटीक लाल गाऊनमध्ये रेड कार्पेटवर ग्लॅमरस दिवासारखी दिसत होती.

तिने कार्पेटवर स्ट्रॅपलेस शिमरी गाऊन घातला होता. यासोबत सोनमने लाँग श्रगही कॅरी केला होता.

तिने हा लूक डायमंड नेकलेसने पूर्ण केला.

सोनम कपूर पेस्टल ब्लू टेसल ड्रेसमध्ये दिसून आली.

यासाठी तिने आंतरराष्ट्रीय डिझायनर टॉलर मार्मोच्या कफ्तान ड्रेसची निवड केली होती.