जॉन अब्राहमच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार सोनिया राठी

Shweta Shigvan-Kavankar

ब्रोकन बट ब्यूटीफुल यातील अभिनेत्री सोनिया राठी आता जॉन अब्राहमच्या तारा व्हर्सेस बिलाल या चित्रपटातून झळकणार आहे.

या चित्रपटात तिच्यासह हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याविषयी अभिनेत्री म्हणाली- उत्साह नक्कीच आहे पण मी खूप नर्व्हस देखील आहे. मी अशी व्यक्ती आहे जी प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. या चित्रपटादरम्यानही मी शूटिंगला सुरुवात केली तेव्हा मला खात्री पटली.

तिच्या ऑडिशनवर सोनिया म्हणाली, मला चित्रपटाचा शेवटचा सीन देण्यात आला होता, ज्यामध्ये फक्त रडणे होते. ऑडिशनमध्ये मी इतके रडले की रडताना मला ताराची भूमिका मिळाली असे म्हणता येईल. मात्र, त्या रडण्याच्या सीनवरही मला अनेक व्हेरिएशन्स द्यावे लागले.

जॉन अब्राहम तारा Vs बिलाल या चित्रपटाशी सह-निर्माता म्हणून जोडला गेला आहे.

अक्षय कुमारचा राम सेतू आणि तारा व्हर्सेस बिलाल एकाच वेळी रिलीज होत आहेत.

यावर जॉन म्हणतो की, आपल्या सर्वांना चित्रपट कधी ना कधी रिलीज करावाच लागेल. आता हा निर्णय चुकीचा आहे की योग्य, मी त्यातला तज्ञ नाही. आजच्या युगात, रिलीजच्या तारखा निवडणे खरोखर कठीण काम झाले आहे.

ब्रोकन बट ब्यूटीफुल यातून सोनियाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

ब्रोकन बट ब्यूटीफुल या चित्रपटात सोनिया सिद्धार्थ शुक्लासोबत दिसली होती.