लग्नाच्या तीन महिन्यांनंतर स्वरा भास्करकडे गुडन्यूज; फ्लॉन्ट केला बेबी बंप

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे.

तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

स्वराने तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करत गुडन्यूज दिली आहे.

फोटोमध्ये स्वरा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

स्वरा आणि फहादने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.

स्वराने फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, कधी कधी तुमच्या सर्व इच्छा एकाच वेळी पूर्ण होतात. धन्य, कृतज्ञ आणि नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी उत्साही.

यानंतर नेटकऱ्यांनी स्वराला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. तर, सेलिब्रिटींनीही तिचे अभिनंदन केले आहे.

स्वरा भास्करने फेब्रुवारी 2023 मध्ये बॉयफ्रेंड फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केले होते.

यानंतर या जोडप्याने मार्च 2023 मध्ये त्यांनी पारंपारिकरित्या लग्नबंधनात अडकले होते.

लग्नाच्या 3 महिन्यांनंतर या जोडप्याला पहिल्या बाळाची अपेक्षा आहे.