‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम रॉयल फोटोशूट; नेटकऱ्यांना आठवली राणी एलिझाबेथ

Shweta Shigvan-Kavankar

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत स्रेहलता वसईकरने साकारलेली सोयरा बाईसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली होती.

स्रेहलता सोशल मीडियावर स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते.

पण, स्नेहलताने नुकतंच रॉयल फोटोशूट केलं आहे. याचे फोटोही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

स्नेहलताने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान करत राणीसारखा पेहराव केला आहे.

गळ्यात नेकलेस आणि डोक्यावर फुलांचा मुकुट परिधान करत स्नेहलताने फोटोशूट केलं आहे.

तिचे हे रॉयल फोटो चांगलेत व्हायरल झाले असून स्नेहलताचा लूक पाहून चाहते अवाक् झाले आहेत.

तिचे रॉयल अंदाजातील फोटो पाहून नेटकऱ्यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची आठवण झाली.

एका चाहत्याने कमेंट करत हुबेहुब राणी एलिझाबेथ असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने लाखो दिलांची राणी, अशी कमेंट केली आहे.

स्रेहलताने ‘फू बाई फू’मधून तिच्या अभिनयाच्या कारकिदीर्ला सुरुवात केली. मात्र, ऐतिहासिक भूमिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली.

स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.