तमन्नाने दिली प्रेमाची कबुली; म्हणाली, तो माझ्यासाठी हॅप्पी प्लेस

Shweta Shigvan-Kavankar

तमन्ना भाटिया दाक्षिणात्यसह बॉलीवूडमध्येही प्रसिध्द अभिनेत्री आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

गोव्यातील न्यू इयर पार्टीमध्ये दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

यानंतर दोघेही डिनर डेटवर आणि एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते.

आता तमन्नाने पहिल्यांदाच मीडियासमोर या नात्याची कबुली दिली आहे.

नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात एकत्र दिसलेल्या तमन्ना आणि विजयची जवळीक शूटिंगदरम्यानच वाढली होती.

एका मुलाखतीत तमन्ना म्हणाली, एक अशी व्यक्ती आहे जिची मी खूप काळजी घेते. ते माझे हॅप्पी प्लेस आहे.

तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता कारण तो तुमचा सहकलाकार आहे. माझ्याकडे अनेक सहकलाकार आहेत. मला वाटतं जर एखाद्याच्या प्रेमात पडायचं असेल, कोणासाठी काही वाटायचं असेल तर ते अगदी वैयक्तिक आहे, असेही तमन्नाने म्हंटले आहे.

ती पुढे म्हणाली, एका मुलीला जोडीदारासाठी तिचे संपूर्ण आयुष्य बदलावे लागते. त्या माणसासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील, पण तो (विजय वर्मा) तसा नाही. त्याला माझे जीवन आणि गोष्टी पूर्णपणे समजतात.