तेजस्वी प्रकाश झळकणार मराठी चित्रपटात; 'या' दिवशी रिलीज होणार

Shweta Shigvan-Kavankar

सध्या अनेक हिंदी कलाकारांना मराठी सिनेसृष्टीची भुरळ पडली आहे. मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमठविण्यासाठी हिंदी कलाकार सज्ज आहेत. अशातील एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश.

'बिग बॉस 15'ची विजेती आणि 'नागिन' फेम तेजस्वी प्रकाश लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती अभिनय बेर्डेसोबत एका चित्रपटात झळकणार आहे.

'मन कस्तुरी रे' या चित्रपटात अभिनय आणि तेजस्वीची जोडी दिसणार आहे. येत्या 4 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

अभिनयने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे. मन सांगे हे मला वेड लागे या जीवा, सावरू नको रे तू मला, नव्या स्पंदनांची नवी लव्हस्टोरी मन कस्तुरी रे, असे कॅप्शन या पोस्टला अभिनय बेर्डेने दिले आहे.

तेजस्वी प्रकाशने वयाच्या 18 व्या वर्षापासून करिअरची सुरूवात केली होती. 2012 मध्ये तिने टीव्ही शो '2612' मध्ये अभिनय केला होता. तसेच, तेजस्वीने संस्कार धरोहर अपनों की, स्वरागिनी, पहरेदार पिया की व सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकांमध्येही झळकली आहे. सध्या ती 'नागिन' मध्ये मालिकेत काम करत आहे.

तेजस्वी प्रकाश करण कुंद्रासोबतच्या आपल्या नात्यामुळेसुद्धा प्रचंड चर्चेत असते. अनेक वेळा त्यांनी सोशल माध्यामांद्वारे आपले प्रेम व्यक्त केले आहे.

तेजस्वी प्रकाश सर्वात जास्त शिक्षित अभिनेत्रीपैकी एक आहे. मुंबई विद्यापीठातून तिने इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्स या विषयांमध्ये अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे.