2022 मध्ये या मराठमोळ्या कलाकारांनी बांधली लग्नगाठ

Siddhi Naringrekar

18 मे 2022 रोजी अभिनेत्री हृता दुर्गुळे ही प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे. प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.

23 जानेवारी 2022 रोजी गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपेवाड्यात रोहित आणि जुईली यांनी लग्नगाठ बांधली.

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी 3 मे रोजी लग्नगाठ बांधली.

अभिनेत्री नेहा कुलकर्णीनं 16 ऑगस्ट 2022 रोजी ओमकार कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली. नेहानं तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले.