Urfi Javed |कळलं! उर्फी जावेदचे अतरंगी आउटफिट डिझाइन कोण करत

shweta walge

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी​​ जावेदची (Urfi Javed) अतरंगी फॅशन (Fashion) पाहून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. उर्फीच्या फॅशनच्या मागे कोण आहे, तिचे कपडे डिझाइन (Design) कोण करत. तर आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहोत.

उर्फी जावेदचे जवळपास सर्व कपडे श्वेता डिझाइन करते. एका मुलाखतीत उर्फीने सांगितले होते की ती श्वेताला 15 वर्षांपासून ओळखते. उर्फी खूप दिवसांपासून डिझायनरच्या शोधात होती, मग तीला श्वेताचा विचार आला. आणि श्वेताशी बोलली आणि हा प्रवास सुरू झाला.

श्वेता श्रीवास्तव (Shweta Srivastava) हिने सांगितले की, सर्व कल्पना फक्त उर्फीच्या आहेत. तिला कसा आणि कोणता ड्रेस घालायचा आहे हे ती स्वतः सांगते. उर्फीच्या म्हणण्यानुसार, श्वेता लगेचच असा ड्रेस डिझाइन (Dress design) करते.

श्वेताच्या म्हणण्यानुसार, उर्फी जावेदचे बहुतेक कपडे शिवायला तास लागतात. काही वेळा रात्रीपर्यंत काम सुरू असते. कधी कधी शिवायला एवढा वेळ लागतो की सकाळ होते. श्वेताने स्वतः अनेकवेळा रात्रभर बसून उर्फीचे कपडे शिवले आहेत.

डिझायनर श्वेता श्रीवास्तव पुढे सांगते की, तिला अनेकदा उर्फीसाठी कपडे शिवण्यास नकार सांगितले जाते. मित्र आणि नातेवाईक म्हणतात तू उर्फीसाठी का काम करतेस. पण मी त्यांना सांगते की हे माझे काम आणि माझा दृष्टिकोन आहे. तुम्हाला ते आवडत नसेल तर तुमची समस्या आहे, मला या गोष्टींची पर्वा नाही.

श्वेताला उर्फीचे कपडे शिवण्यात मजा येते. श्वेता म्हणते की मी दुसऱ्याचे कपडे शिवत नाही. मी बॉलिवूडमध्ये इतर कोणासाठी काम करत नाही. मी फक्त उर्पी जावेदसाठी काम करते. आणि हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.

उर्फी जावेदने यापूर्वी कसौटी जिंदगी की सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचवेळी उर्फी बिग बॉस ओटीटीमध्ये (Big Boss OTT) देखील दिसली होती. तेव्हापासून तिने तिची नवीन सुरुवात केली.