Siddhi Naringrekar
आज जागतिक चिमणी दिवस आहे.
कधीकाळी दिसणाऱ्या चिमण्या ह्या आज दिसत नाहीत
अन्नसाखळीत एक महत्वाचा दुवा असणारी चिमणी आज झपाट्याने घटत चालली आहे
जगात अस्तित्वात असणाऱ्या २६ पैकी ५ चिमण्या भारतात आढळतात.
वाढत्या शहरीकरणामुळे शेती मर्यादीत प्रमाणात राहीली. आणि त्याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर झाला
चीनने 1958 ते 1962 या काळात उंदीर, माशा, डास आणि चिमणी हे चार प्रजाती नष्ट करून शेतीचे संरक्षण करण्याची मोहीम हाती घेतली.
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चिमणी दिन साजरा करण्याचा निर्णय झाला आहे.
२०१० साली नाशिकच्या एका संस्थेने पुढाकार घेऊन चिमणी दिवस साजरा केला होता.
त्यानंतर आता जागतिक चिमणी दिवस अर्थात वर्ल्ड स्पॅरो डे साजरा केला जात आहे.