KGF 2 : यशच्या 'केजीएफ 2'ने सहा विक्रम केले नावावर

left

'केजीएफ 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.
कोरोना महामारीनंतर सर्वाधिक स्क्रीनवर रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा एकाच वेळी 4400 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
'केजीएफ 2' सिनेमाच्या हिंदी आवृत्तीने पहिल्याच दिवशी 65 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने बाहुबली 2 (41 कोटी), वार (53.35 कोटी) आणि ठग्स ऑफ हिंदुस्तान (52.25 कोटी)चे ओपनिंग डे कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत.
'केजीएफ 2' सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरने चांगलाच धुमाकूळ घालता होता. टीझरला 250 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ट्रेलरलादेखील 24 तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळाले होते.
प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ 2' हा ग्रीसमध्ये रिलीज होणारा पहिला कन्नड सिनेमा ठरलाय.
हा सिनेमा जगभरात 10,000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.