Shweta Shigvan-Kavankar
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'योगयोगेश्वर जय शंकर' प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे.
अल्पवधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.
ही मालिका श्री शंकर महाराजांच्या लीलांवर आधारलेली आहे.
त्यांचं कार्य जनमानसात पोहोचवण्याचं काम ही मालिका करत आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेतही विठ्ठलाचे दर्शन होणार आहे.
शंकर महाराज बालगंधर्व यांना विठुरायाच्या रुपात दर्शन देणार आहेत.
आषाढी एकादाशी विशेष हा भाग आज आणि उद्या संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणार आहे.
शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारत आहे.