Job Updates
आनंदाची बातमी! बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 150 पदांची भरती
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल ऑफिसरच्या 150 पदांवर भरती सुरु आहे. जनरल ऑफिसर पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 6 एप्रिल 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा. अर्जाची तारीख संपल्यानंतर वेबसाईटवरून लिंक हटवण्यात येईल.या भरती प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध शाखांमध्ये नोकरी दिली जाईल.
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 48,170 रुपये ते 69,810 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.