Bramapuri Ganesh Utsav | ब्रम्हपूरी शहरात गणेशोत्सवाचा उत्साह; मंडळाच्यावतीने राम मंदिराची प्रतिकृती

चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी शहरात गणेशोत्सवाची यावर्षी उत्साहाने सुरुवात झालेली आहे.
Published by :
Team Lokshahi

चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी शहरात गणेशोत्सवाची यावर्षी उत्साहाने सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्षनेते वियज वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केलेली आहे. यावर्षी या मंडळाकडून अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. तसेच रामाची प्रतिकृती देखील उभारण्यात आलेली आहे.

या शहरातील तसेच इतर काही लोक जे राम मंदिरात जाऊ शकले नाहीत त्यांना याठिकाणी अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती पाहून राम मंदिराचा आनंद घेण्यात येईल. तसेच विविध देव देवता, संत, महापुरुष तसेच अनेक संतपुरुष यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. तसेच या देखाव्यात भाविक भक्तीमय वातावरणात दंग झालेले पाहायला मिळत आहेत तर हा देखावा अनेकांचे लक्ष वेधून घेणारा आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 10 दिवस याठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com