अर्थसंकल्पातील प्रकल्पांना निधी कुठून येणार आणि कुठे जाणार वाचा सविस्तर…

अर्थसंकल्पातील प्रकल्पांना निधी कुठून येणार आणि कुठे जाणार वाचा सविस्तर…

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क
संसदेमध्ये सोमवारी (काल) केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. याअर्थ अर्थसंकल्पात पायाभूत प्रकल्पांसाठी करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पांसाठी निधी कुठून येणार आणि कुठे जाणार याची थोडक्यात माहिती घेऊया

पैसा येणार कुठून?

  1. बीपीसीएलचं निर्गुंतवणुकीकरण
  2. आयडीबीआय बँकेतले शेअर्स विकणार
  3. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं निर्गुंतवणुकीकरण
  4. एअर इंडियाचं खासगीकरण
  5. कंटेनर कॉर्पचं निर्गुंतवणुकीकरण
  6. LIC मधले काही शेअर्स विकणार
  7. अल्कोहोलच्या सेसमध्ये 100 टक्के वाढ

पैसा कुठे खर्च होणार?

  1. कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी
  2. आरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटी
  3. सार्वजनिक बँकांना 20 हजार कोटी रुपये
  4. प. बंगालमधल्या रस्ते प्रकल्पांसाठी 25 हजार कोटी
  5. संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटी
  6. शहरांतल्या सार्वजनिक बसेसाठी 18 हजार कोटी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com