Vande Bharat
VANDE BHARAT SLEEPER TRAINS AND AMRIT BHARAT STATIONS TO MODERNIZE RAILWAY TRAVEL

Budget 2026: Vande Bharat ट्रेनचा प्रवास आता सुखकर, सरकारने केले मोठं आर्थिक वचन, होतील तब्बल इतके कोटी खर्च

Vande Bharat: १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.७-२.८ लाख कोटींचा निधी जाहीर होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन, अमृत भारत स्टेशन आणि आधुनिक सुविधा प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

उद्या, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग ९ व्या अर्थसंकल्पाची सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी खास पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार, रेल्वेला २.७० लाख कोटी ते २.८० लाख कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो. केंद्र सरकार रेल्वेची सुविधा आधुनिक आणि आरामदायी करण्यावर भर देणार असून, यंदा रेल्वेलाच सर्वाधिक निधी मिळण्याचा अंदाज आहे.

रेल्वे मार्गांचा विस्तार, नवीन रेल्वेची निर्मिती आणि आधुनिकीकरण यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. जून महिन्यापर्यंत ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असून, पूर्ण आर्थिक वर्षात एकूण १२ अशा आधुनिक ट्रेन देशाला मिळणार आहेत. या ट्रेन विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या गेल्या असून, मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी अमृत भारत स्टेशनांचा विस्तारही केला जाणार आहे.

मार्च महिन्यापर्यंत अमृत भारत स्टेशनांचे नवीन व्हर्जन सुरू होईल, ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर केला जाईल. यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. तसेच, पुढील दोन वर्षांत वेटिंग लिस्टची समस्या दूर करण्यासाठी अतिरिक्त डबे जोडले जातील आणि नवीन पिढीच्या रेल्वेची निर्मिती होईल. या सर्व घोषणा उदाच्या अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ च्या सादरीकरणाची उलटी मोजणी सुरू झाली आहे. आज, ३१ जानेवारी रोजी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे पारंपारिक ‘हलवा समारंभ’ पार पडला. या समारंभात अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना मिठाई वाटली आणि अर्थसंकल्प छपाईला सुरुवात केली.

भारतीय परंपरेनुसार मिठाई शुभ मानली जाते, पण प्रशासकीयदृष्ट्या हा समारंभ अर्थसंकल्पाच्या गुप्ततेची सुरुवात दर्शवतो. हलवा समारंभानंतर सुमारे ६० ते ७० अधिकारी आणि कर्मचारी ‘लॉक-इन’ कालावधीत जातात, ज्यामुळे कोणतीही माहिती गळती होत नाही. हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार असून, विशेषतः रेल्वे क्षेत्रातील घोषणा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरतील. सादरीकरणावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com