BMC Budget 2026 :  BMC बजेट उद्या!  'या' विभागांना मिळणार ऐतिहासिक निधी

BMC Budget 2026 : BMC बजेट उद्या! 'या' विभागांना मिळणार ऐतिहासिक निधी

BMC Budget 2026-27 : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. यात पुढील क्षेत्रांनी भरीव निधी मिळण्याची शक्यता आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

BMC Budget 2026-27 : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. यात पुढील क्षेत्रांनी भरीव निधी मिळण्याची शक्यता आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महापालिका उद्या 2026-27 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीने विजय मिळवला असून महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी निवडले गेले आहेत. नव्या नेतृत्वाखालील हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे त्याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.

सकाळी 11 वाजता शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पाची मांडणी होईल, तर दुपारी 2 वाजता महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी स्थायी समितीसमोर मुख्य अर्थसंकल्प सादर करतील. नंतर दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद होईल. त्यानंतर पालिकेच्या सभागृहात नवीन सदस्यांची नेमणूक आणि विविध समित्यांचे पुनर्गठनही करण्यात येणार आहे.

या वर्षाचा अर्थसंकल्प तब्बल 80 हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे. यात रस्ते, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उद्याने, प्राणिसंग्रहालये, कोळीवाड्यांचा विकास आणि मोठ्या प्रकल्पांसाठी भरीव निधी राखण्यात येणार आहे. तसेच तिजोरीतील तूट भरण्यासाठी काही नव्या करांचा विचार केला जाऊ शकतो. मुंबईकरांसाठी हा अर्थसंकल्प विकासाचे आणि सुधारणा सुनिश्चित करणारा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com