Airtel Update
AIRTEL ENDS FREE PERPLEXITY PRO SUBSCRIPTION: USERS NOW FACE BILLING CHANGES

Airtel Update: कोट्यवधी युजर्सना मोठा झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी ‘ही’ सुविधा

Perplexity Pro: एअरटेलने Perplexity Pro चे मोफत सबस्क्रिप्शन संपवले. यामुळे प्रीपेड युजर्सना आता शुल्क भरावे लागेल.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने Perplexity Pro चे मोफत सबस्क्रिप्शन बंद करण्याची घोषणा केली असून, यामुळे युजर्समध्ये नाराजी व्यक्त होत आहे. २०२५ मध्ये लाँच झालेल्या या ऑफरची किंमत १७,००० रुपये होती, जी प्रीपेड प्लॅन युजर्सना मर्यादित काळासाठी मोफत मिळत होती. मात्र १६ जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत संपल्याने ही सुविधा आता बंद झाली आहे.

Perplexity Pro वापरणाऱ्यांना आता बिलिंग नोटिस भरावी लागेल. फ्री ट्रायल संपल्यानंतर सबस्क्रिप्शन रद्द न केल्यास शुल्क आकारून आपोआप रिन्यू होईल. ज्यांना पैसे खर्च नकोत त्यांनी वेळीच सेवा बंद करावी, अन्यथा शुल्क वसूल केले जाईल असे कंपनीने सूचित केले आहे.

या निर्णयामुळे युजर्समध्ये निराशा आहे, पण ज्यांनी वेळेत फायदा घेतला त्यांना एक वर्षाचा लाभ कायम राहील. एअरटेलकडून भविष्यात अशा नवीन ऑफर्सची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com