Jio Recharge Plan: जिओचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, फक्त 125 रुपये आणि भरपूर डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने बजेट रेंजमधील नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. केवळ १२३ रुपयांच्या या प्लॅनची वैलिडिटी २८ दिवसांची असून, तो फक्त जिओ भरत फोन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी हा प्लॅन लागू होणार नाही. कमी खर्चात कॉलिंग आणि मर्यादित डेटा हवा असणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
या प्लॅनमध्ये दररोज ०.५ जीबी डेटा मिळेल, म्हणजेच २८ दिवसांत एकूण १४ जीबी डेटा उपलब्ध होईल. हा डेटा व्हॉट्सअॅप, गूगल सर्च आणि हलके यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय संपूर्ण भारतात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि ३०० मोफत एसएमएसची सुविधा मिळेल. एसएमएस ओटीपी किंवा बँक अलर्टसाठी उपयुक्त ठरेल.
जिओ अॅप आणि ओटीटी फायदे
या प्लॅनमध्ये जिओ अॅपचा मोफत ऍक्सेस मिळेल. जिओसावनवर संगीत आणि जिओ टीव्हीवर लाइव्ह चॅनेल्स पाहता येतील, त्यासाठी अतिरिक्त शुल्क नाही. फक्त साइन इन करून वापरता येईल. मात्र, जास्त डेटा किंवा स्ट्रीमिंगसाठी हा प्लॅन योग्य नाही.
जिओ भरत फोनवरच मर्यादित
हा प्लॅन केवळ जिओ भरत फोनवर कार्यरत असेल. स्मार्टफोन यूजर्सना इतर प्लॅन्सकडे वळावे लागेल. जिओने हे प्लॅन कमी खर्चात मूलभूत गरजा भागवण्यासाठी लाँच केले असून, ग्राहक त्वरित MyJio ऍपद्वारे रिचार्ज करू शकतात. या प्लॅनमुळे बजेट यूजर्सना फायदा होईल.
₹125 रिचार्ज प्लॅन फक्त जिओ भरत फोनसाठी उपलब्ध.
28 दिवसांसाठी दररोज 0.5GB डेटा; एकूण 14GB डेटा मिळेल.
संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 300 मोफत एसएमएस.
जिओ अॅप्स आणि OTT फायदे मोफत वापरता येतील, अतिरिक्त शुल्क नाही.
