Premium SUV: ग्राहकांनो! 'या' कारच्या फीचर्स पाहिल्यानंतर Toyota Fortuner विसरून जाल; एकदा पाहाच!
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
भारतीय ऑटो बाजारात SUVs ची मागणी वाढत असताना, MG Motors टोयोटा फॉर्च्युनरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ‘MG Majestor’ ही नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने लाँचपूर्वी या SUV चा रोमांचक टीझर जारी केला असून, त्यात कारचे प्रमुख फीचर्स आणि क्षमतेची झलक मिळाली. ही SUV १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतात अधिकृतपणे बाजारात येईल, ज्यामुळे प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा तापेल.
टीझरनुसार, MG Majestor मध्ये 4X4 क्षमता आणि विविध टेरेन मोड्स असतील, जसे स्नो, मड, सॅन्ड आदी. यामुळे ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी ती आदर्श असेल. एक्स्टेरियरमध्ये LED हेडलाइट्स, LED DRL, मोठी ग्रिल आणि २० इंच अलॉय व्हील्ससह ड्युअल टोन डिझाइन दिसेल. इंटेरियर प्रीमियम असेल ज्यात १२.३ इंच इंफोटेनमेंट सिस्टम, ड्युअल टोन थीम, टाइप-सी USB चार्जिंग, पुश बटन स्टार्ट, पॅनोरमिक सनरूफ आणि वायरलेस चार्जिंग असे फीचर्स असतील.
सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स, ABS, EBD, हिल असिस्ट, BSD, LCA, RCTA, DOW, सेल्फ-अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ADAS सारखी आधुनिक वैशिष्ट्ये मिळतील. इंजिन पर्यायांबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही, पण अपेक्षेनुसार पेट्रोल इंजिन १८४ kW पॉवर आणि ४१० Nm टॉर्क देईल, तर टर्बो डिझेल १६० kW पॉवर आणि ५०० Nm टॉर्कसह येईल. दोन्ही इंजिन ४X४ सिस्टम आणि ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतील. टॉप स्पीड पेट्रोलमध्ये १९० kmph आणि डिझेलमध्ये १७५ kmph पर्यंत असू शकते.
किंमत ४० ते ५० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान अपेक्षित आहे. Toyota Fortuner सारख्या लोकप्रिय SUV ला ही Majestor जोरदार टक्कर देईल, ज्यामुळे ग्राहकांकडे अधिक पर्याय उपलब्ध होतील.
MG Majestor १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतात लॉन्च होणार.
SUV मध्ये 4X4 क्षमता, स्नो, मड, सॅन्ड मोड्स आणि ऑफ-रोड फीचर्स आहेत.
इंटिरियरमध्ये 12.3 इंच इंफोटेनमेंट, ड्युअल टोन थीम, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग आहे.
सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ADAS आणि सेल्फ-अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल समाविष्ट.
