Smart Glasses
DON’T IGNORE THESE ESSENTIAL FEATURES FOR AI, COMFORT AND PRESCRIPTION SUPPORT

Tech Tips: स्मार्ट ग्लासेस खरेदी करताय? 'हे' काही फीचर्स दुर्लक्षित करणे तुमच्यासाठी महाग पडू शकते

Smart Glasses: स्मार्ट ग्लासेस खरेदी करताना फक्त लुकवर विश्वास ठेवू नका. वजन, डिझाइन, फिनिशिंग, प्रिस्क्रिप्शन सपोर्ट आणि AI फीचर्स तपासल्यास दीर्घकाळ आरामदायक आणि स्मार्ट अनुभव मिळेल.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

टेक कंपनी मेटाने आधीच स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत आणि यंदा गुगल व ॲपलही त्यांचे स्मार्ट ग्लासेस बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. या ग्लासेसमध्ये स्मार्टफोनसारखी AI फीचर्स असतात, ज्यामुळे ते अधिक स्मार्ट होतात. बाजारात ऑडियो-ओनली, कॅमेरा-इक्विप्ड आणि डिस्प्ले-बेस्ड असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. कंटेंट क्रिएटर्ससाठी कॅमेरा ग्लासेस उत्तम, तर साध्या ऑडिओ आणि कॉलिंगसाठी ऑडियो-ओनली पर्याय चांगला. स्मार्टफोनचा पर्याय म्हणून डिस्प्ले-बेस्ड ग्लासेस निवडता येतील. खरेदीपूर्वी गरजेनुसार निवड करणे महत्त्वाचे आहे.

स्मार्ट ग्लासेसची खरेदी करताना फॅन्सी फीचर्सपेक्षा मूलभूत गरजा प्राधान्य द्या. डिझाइन आणि फिनिशिंगकडेही लक्ष द्या, कारण आता हे ग्लासेस सामान्य चष्म्यांसारखे दिसतात. पूर्वी जड आणि मोठ्या फ्रेमचे असायचे, आता ते हलके आणि स्टायलिश झाले आहेत. तरीही फिनिशिंगची गुणवत्ता तपासा जेणेकरून दीर्घकाळ टिकतील.

स्मार्ट ग्लासेसचा वजन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ५०-५५ ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे ग्लासेस नाक आणि कानांना जड वाटतात, विशेषतः दीर्घकाळ वापरात. हलके ग्लासेस निवडल्यास आरामदायक राहतात. जर तुम्हाला चष्मा लागत असेल, तर प्रिस्क्रिप्शन लेन्स सपोर्ट तपासा.

ब्रँडकडून हे सुविधा देत असतील तर सोयीचे, अन्यथा लोकल ऑप्टिकलकडून फिटिंगसाठी जास्त खर्च येऊ शकतो. या वर्षी स्मार्ट ग्लासेस बाजार विस्तारेल आणि AI-संपन्न मॉडेल्स लोकप्रिय होतील. योग्य निवडीने तुम्हाला स्मार्ट लाइफस्टाइल मिळेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com