Suzuki Access 125
SUZUKI ACCESS 125 LAUNCHED WITH ABS SAFETY FEATURES, RIDE CONNECT AND TFT VARIANTS IN INDIA

Suzuki Access 125: नवीन Suzuki Access लाँच! ‘या’ सेफ्टी फिचरमुळे राइडिंग अनुभव होईल, जाणून घ्या किंमत

Ride Connect: नवीन Suzuki Access 125 ABS व्हेरिएंट्स लाँच! Access Ride Connect आणि TFT Edition मध्ये उपलब्ध, नवीन ABS सुरक्षा, डिजिटल स्पीडोमीटर, LED हेडलाइट्स, ब्लूटूथ आणि USB पोर्टसह प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होईल.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारतीय दुचाकी बाजारात स्कूटरला बाईकपेक्षा जास्त मागणी असते, कारण ती रहदारीत चालवणे सोपे आणि सोयीस्कर असते. ग्राहक मायलेज, परफॉर्मन्स आणि सुरक्षेसाठी लोकप्रिय स्कूटर निवडतात. अशाच लोकप्रिय सुजुकी एक्सेस 125 ला कंपनीने नुकतेच अपडेट दिले आहे. नव्या अपडेट्समुळे ही स्कूटर आता अधिक सुरक्षित आणि प्रगत झाली असून, रायडर्ससाठी प्रवास अधिक आरामदायक होईल. कंपनीने ABS सारखी प्रगत सेफ्टी फीचर्स जोडली आहेत, जी ब्रेक प्रेशर नियंत्रित करून व्हील लॉक होण्यापासून रोखतात. अचानक ब्रेकिंगदरम्यान ही सुविधा खूप उपयुक्त ठरते.

सुजुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक केनिची उमेडा यांनी याबाबत बोलताना म्हटले की, ABS सहित सुजुकी एक्सेस सादर करून आम्ही आमच्या पोर्टफोलिओला अधिक मजबूत करत आहोत. या नव्या व्हेरिएंट्समुळे ग्राहकांना त्यांच्या रायडिंग स्टाइलनुसार सोयीचा पर्याय मिळेल. ही स्कूटर आता Access Ride Connect ABS Edition आणि Access Ride Connect TFT ABS Edition या दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाली आहे. एक्स-शोरूम किंमत ९२,३२८ रुपयांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटची ९८,३७८ रुपये आहे.

भारतीय बाजारात सुजुकी एक्सेस ने नेहमीच छान विक्री रेकॉर्ड केला आहे. नव्या ABS व्हेरिएंट्समुळे सुरक्षेवर भर देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल. ही स्कूटर लाँच होताच डीलरशिपवर चांगली मागणी दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com