Gold-Silver Rate
GOLD SILVER PRICE SURGE IN INDIA AFTER US TARIFF CUT | SENSEX NIFTY SOAR

Gold-Silver Rate: अमेरिकेने टॅरिफ कमी करताच सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी, जाणून घ्या दर

India Market: अमेरिकेच्या टॅरिफ कपातीमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सोनं-चांदीच्या भावात मोठी उसळी झाली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

अमेरिकेचे राष्ट्राधीक्षक डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री भारतावर लादलेला आयात कर (टॅरिफ) कमी करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात कमाल उसळी पाहायला मिळाली. बाजार उघडताच सेन्सेक्स २२०० अंकांनी आणि निफ्टी ७०० अंकांनी वर चढला.

या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला असून, त्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले. दुसरीकडे, सोने-चांदीच्या भावातही प्रचंड तेजी आली आहे. वायदा बाजार उघडल्यानंतर एक किलो चांदीचा दर तब्बल २० हजार रुपयांनी वाढून अडीच लाखांच्या पलीकडे गेला, तर सोन्याचा भाव प्रतितोळा साडेचार हजार रुपयांनी उसळला.

सध्याच्या दरानुसार, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत सोने-चांदीच्या किमतीत प्रचंड चढउतार होत असल्याने गुंतवणूकदार आणि ज्वेलर्समध्ये उत्सुकता आहे. अमेरिकेच्या टॅरिफ कपातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक संकेत मिळाले असून, त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, हे वाढत्या जागतिक व्यापार तणाव कमी होण्याचे लक्षण आहे, ज्यामुळे सोने-चांदीसारख्या सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

मुंबईतील प्रमुख बाजारांमध्येही हा ट्रेंड दिसून येत आहे. चांदीचा एक किलोचा दर २.५० लाखांपर्यंत पोहोचल्याने छोटे व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये आनंदाची लहर आहे. मात्र, भावातील हे अचानक वाढण्यामुळे खरेदीदार सावध झाले आहेत. भांडवली बाजारातील ही तेजी दिवभर कायम राहील का, हे पाहणे रोचक ठरेल. गुंतवणूकदारांनी सतर्क राहून निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

Summary

• अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कपात केली
• सेन्सेक्स २,२०० अंकांनी, निफ्टी ७०० अंकांनी वाढले
• सोनं १० ग्रॅम ₹१,४८,०००, चांदी १ किलो ₹२,५०,००० पर्यंत
• गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी, भावात तेजी दिसून आली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com