JioHotstar यूजर्ससाठी धक्का! JioHotstar चे सब्सक्रिप्शन प्लॅन्स वाढले, दरमहा मोजावे लागतील 'इतके' पैसे
ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारने सब्स्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमतींमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. मोबाईल, सुपर आणि प्रीमियम अशा तिन्ही कॅटेगिरींमधील प्लॅन्स महाग झाले असून, कंटेंट नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. कंपनीने सोमवारी ही घोषणा केली असून, नवीन प्लॅन्स २८ जानेवारी २०२६ पासून लागू होतील. यामुळे लाखो यूजर्सवर परिणाम होईल आणि मोबाईल, सुपर प्लॅन्समध्ये जाहिराती दिसतील.
नवीन नियमांनुसार, हॉलीवूड कंटेंट केवळ सुपर आणि प्रीमियम प्लॅन्समध्ये उपलब्ध असेल. मोबाईल यूजर्सना हॉलीवूडसाठी वेगळा अॅड-ऑन पॅक खरेदी करावा लागेल. मोबाईल प्लॅन केवळ एका डिव्हाईससाठी आहे, ज्यात ७२०पी एचडी रेजोल्यूशन मिळेल. त्याची मासिक किंमत ७९ रुपये, तिमाही १४९ रुपये आणि वार्षिक ४९९ रुपये आहे. हॉलीवूड अॅड-ऑनसाठी मासिक ४९ रुपये, तिमाही १२९ रुपये आणि वार्षिक ३९९ रुपये द्यावे लागतील.
सुपर प्लॅन दोन डिव्हाईससाठी आहे, ज्यात १०८०पी फुल एचडी कंटेंट मिळेल. याची मासिक किंमत १४९ रुपये, तिमाही ३४९ रुपये आणि वार्षिक १०९९ रुपये आहे. हा टीव्हीसाठी परवडणारा पर्याय असून, हॉलीवूड अॅड-ऑनची गरज नाही. प्रीमियम प्लॅन चार डिव्हाईससाठी आहे, ज्यात ४के रेजोल्यूशन आणि डॉल्बी व्हिजन मिळेल. त्याची मासिक किंमत २९९ रुपये, तिमाही ६९९ रुपये आणि वार्षिक २१९९ रुपये आहे. यात जाहिरातमुक्त कंटेंट मिळेल, फक्त लाईव्ह स्पोर्ट्समध्ये जाहिराती येतील.
या बदलांमुळे बजेट यूजर्ससाठी मोबाईल प्लॅन परवडणारा राहिला, पण हॉलीवूडसाठी अतिरिक्त खर्च वाढला. कंपनीने किंमती वाढवून प्रीमियम अनुभव देण्याचा दावा केला असून, यूजर्स आता नवीन दरांचा विचार करत आहेत.
