Agniveer Recruitment 2026 : लष्कर भरतीत नवा अध्याय; कौशल्याधारित तरुणांसाठी टेक्निकल अग्निवीरचा मार्ग मोकळा
Agniveer Recruitment 2026: व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Armed Forces अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अग्निवीर भरतीत आता कौशल्याधारित अभ्यासक्रमांना विशेष मान्यता देण्यात आली आहे. २०२७ शैक्षणिक वर्षापासून काही निवडक कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना टेक्निकल अग्निवीर म्हणून संधी मिळणार आहे.
नव्या धोरणानुसार शिक्षण दोन टप्प्यांत विभागले आहे – इयत्ता 11वी-12वी स्तरावर वेब तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स विषयांचा समावेश आहे. तर पदवी स्तरावर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या शाखांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जदारांनी संबंधित अभ्यासक्रमात किमान 50% गुण मिळवलेले असणे आणि गणित-भौतिकशास्त्राचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.आधुनिक युद्धतंत्र, सायबर सुरक्षा आणि डेटा व्यवस्थापनासाठी तांत्रिक कौशल्य असलेली पिढी तयार करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण क्षेत्रातील करिअरची दारे अधिक खुली झाली आहेत.

