PM Kisan Yojana
PM KISAN AND NAMO SHETKARI YOJANA: FARMERS TO RECEIVE ₹6,000 DIRECT BENEFIT

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खात्यात लवकरच ₹६००० रुपये जमा होणार, लाभार्थ्याला मिळणार आर्थिक मदत

Farmer Benefit: PM Kisan आणि नमो शेतकरी योजनेतून फेब्रुवारीत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ₹६,००० जमा होणार आहेत. ई-केवायसी आणि आधार लिंकिंग पूर्ण करणे आवश्यक आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांमुळे आर्थिक आधार मिळत असून, फेब्रुवारी महिन्यात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारची पीएम किसान समान निधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात, जे दर चार महिन्यांनी थेट लाभार्थी खात्यात जमा होतात.

नोव्हेंबर २०२५ मध्ये हा शेवटचा हप्ता जमा झाला असून, पुढील २,००० रुपयांचा हप्ता फेब्रुवारीत येण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरू करून त्यातही वार्षिक ६,००० रुपये देण्याची तरतूद केली असल्याने, एकूण वर्षभरात शेतकऱ्यांना १२,००० रुपयांचा लाभ मिळतो. या महिन्यात नमो शेतकरी योजनेचे मागील प्रलंबित हप्त्यासह दोन हप्ते जमा होण्याची शक्यता असून, त्यात ४,००० रुपये आणि पीएम किसानचे २,००० रुपये मिळून एकूण ६,००० रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात.

मात्र, नेमका वितरणाचा कालावधी अद्याप जाहीर झालेला नाही. या दोन्ही योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कामांसाठी निधी उपलब्ध होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून, केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता जमा होत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ pmkisan.gov.in वर जाऊन आधार लिंकिंग आणि केवायसी पूर्ण करावी, अन्यथा निधी अडकण्याचा धोका आहे.

राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले असून, पात्र शेतकऱ्यांनी स्थानिक तहसीलदार किंवा कृषी विभागाकडे संपर्क साधावा. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

Summary
  • शेतकऱ्यांसाठी PM Kisan व नमो शेतकरी योजनेतून ₹६,००० हप्ता जमा

  • वर्षभरात एकूण लाभ ₹१२,००० मिळेल

  • ई-केवायसी आणि आधार लिंकिंग अनिवार्य, अन्यथा निधी अडकण्याचा धोका

  • राज्य व केंद्र सरकारच्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com