Cyber Security: सरकारचा नवा नियम! मोबाईलमधून सिमकार्ड काढताच WhatsApp, Snapchatसह अनेक मेसेजिंग अॅप होणार बंद
भारतामध्ये व्हॉट्अॅप आणि स्नेपचॅटसह विविध मेसेजिंग अॅप्सची लोकप्रियता प्रचंड आहे आणि त्यांचे यूजर्स देखील मोठा आहे. या यूर्सचे फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्अॅप आणि टेलेग्राम वापरणाऱ्या अनेक लोकांना वारंवार लक्ष्य केले आहे.
भारत सरकारने सार्वजनि सुरक्षेसाठी हा नवा नियम लागू केला आहे. या निर्देशांनुसार WhatsApp, Telegram, Signal, Snapchatसह अनेक मेसेजिंग अॅप्स आता वैध भारतीय सिमशिवाय वापरता येणार नाहीत.
दूरसंचार विभागाने (DoT) दूरसंचार सायबरसुरक्षा सुधारणा नियम, २०२५ अंतर्गत नवीन तरतूद लागू केली असून, कंपन्यांना फक्त सक्रिय सिम कार्डधारकांना सेवा देण्याची अट घातली आहे.
मेसेजिंग अॅप्सना नवीन व्यवस्था करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सरकारने त्यांना दूरसंचार ओळखकर्त्यांच्या यादीत समाविष्ट करुन अॅप सक्रिय सिमशी जोडणे बंधनकारक केले आहे.
व्हॉट्सअॅप वेब यूजर्ससाठी नवे नियम लागू झाले आहेत. आता संगणकावरील खाते सहा तासांनी आपोआप लॉगआउट होईल आणि पुन्हा वापरासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
बहुतांश मेसेजिंग अॅप्समध्ये इंस्टॉल करताना मोबाइल नंबरची पडताळणी केली जाते, पण सिम काढल्यानंतरही अॅप चालू राहते. गुन्हेगार या त्रुटीचा फायदा घेऊन सायबर गैरकृत्ये करतात.
नवीन नियमानुसार मेसेजिंग अॅप्स वापरण्यासाठी सक्रिय सिम अनिवार्य असेल. फोनमधून सिम काढताच अॅप निष्क्रिय होईल. ही तरतूद फेब्रुवारी २०२६पासून लागू होणार आहे.
