कृषी सेवक पदाच्या ९५२ जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज
Krushi Sevak Bharti : कृषी सेवक पदाच्या ९५२ जागांसाठी भरती निघाली आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी सेवक पदासाठी ही भरती केली जात आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे आणि ठाणे या विभागांत भरती केली जाणार आहे.
कोणत्या विभागात किती जागा?
नागपूर : 365, नाशिक : 336, ठाणे : 247, कोल्हापूर : 250, लातूर : 170, छ. संभाजीनगर : 196, अमरावती : 156 आणि पुणे 182 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पात्रता
उमेदवाराकडे कृषी विषयांमधील पदविका वा पदवी असणे आवश्यक आहे. तसेच निवड झालेल्या कृषी सेवक पदासाठी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्त कृषी सेवकाचे काम समाधानकारक असेल तर पुढील दोन वर्षांसाठी पुन्हा कृषी सेवक म्हणून नियुक्त केलं जाणार आहे. तसेच कृषी सेवक पदासाठीचा कालावधी ३ वर्ष निश्चित करण्यात आला आहे.
वेतन
कृषी विभागातील कृषी सेवकांच्या पदासाठी दर महिना १६ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आलं आहे.
कसा कराल अर्ज?
कृषी सेवक पदासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पात्र उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत. . संपूर्ण जाहिरात वाचल्यावरच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा.