टेस्लाचे भारतातील पहिलं कार्यालय 'या' ठिकाणी होणार सुरु

टेस्लाचे भारतातील पहिलं कार्यालय 'या' ठिकाणी होणार सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर टेस्ला भारतात आपला उत्पादन कारखाना सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी आता जागाही अंतिम करण्यात आली आहे.

मुंबई : एलॉन मस्कच्या मालकीची दिग्गज इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर टेस्ला भारतात आपला उत्पादन कारखाना सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा कारखाना उभारण्यासाठी आता जागाही अंतिम करण्यात आली आहे. टेस्लाच भारतातील पहिलं कार्यालयात पुण्यात सुरु होणार आहे.

टेस्लाचे भारतातील पहिलं कार्यालय 'या' ठिकाणी होणार सुरु
कलाकाराशी झालेल्या वादातून देसाईंवर बहिष्कार; भाजप नेत्याचा आरोप, 'तो' बॉलिवूड कलाकार कोण?

अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी असलेली टेस्लाच पाहिलं भारतातील पहिलं कार्यालयात पुण्यात सुरु होणार आहे. टेस्ला कंपनी आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना टेस्ला ने आता पुण्यात जागा घेतली आहे. टेस्ला कंपनीने बी विंग, पंचशील बिझनेस पार्क, पुणे येथे 5850 चौरस फूट जागेसाठी 5 वर्षांसाठी करार केला आहे. कंपनीने घेतलेल्या जागेचे भाडे दरमहा 11.56 लाख रुपये आहे. याशिवाय कंपनीने ५ वर्षांसाठी ३४.९५ लाख जमा केले आहेत. या डीलमध्ये कंपनीला 5 कार आणि 10 बाइक्ससाठी पार्किंगची जागा देण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडेच चीनची सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) ची भारतात 1 अब्ज किमतीचा उत्पादन प्रकल्प उभारण्याची ऑफर नाकारली होती. 2020 मध्ये भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर सरकारने केलेले कठोर नियम हे त्याचे कारण आहे. कारण सरकारने चीनी कंपनीची गुंतवणूक प्रस्ताव नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी ग्रेट वॉल ऑफ चायना मोटरकडून जवळपास समान रकमेची गुंतवणूक ऑफर नाकारली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com