West Bangal Election: क्रिकेटर मनोज तिवारीची नवी इनिंग; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश
भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या तिवारी राजकीय मैदानात कशी फटकेबाजी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मनोज तिवारीला देखील तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून एका स्टार कॅम्पेनरचा तृणमूलमध्ये समावेश झाल्यामुळे पक्षाला त्याचा फायदा मिळू शकतो, असा अंदाज राजकीय चर्चा आहे.
तिवारीचे ट्वीट
आपल्या पक्षप्रवेशाआधी मनोज तिवारीने एक ट्वीट करून जनतेकडून पाठिंबा मिळण्याचे आवाहन केले होते. 'आजपासून एक नवा प्रवास सुरू होत आहे. तुम्हा सर्वांचा पाठिंबा आणि प्रेम हवंय', असं त्याने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
क्रिकेट कारकीर्द
२००८मध्ये मनोज तिवारीने भारताकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर त्याने भारतासाठी शेवटचा सामना जुलै २०१५मध्ये खेळला. IPL मध्ये देखील मनोज तिवारीने कोलकाता नाईट रायडर्सकडून आपल्या खेळाची चमक दाखवली.मनोज तिवारीने आत्तापर्यंत १२ एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत.

