Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Japan Earthquake) जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला असून या घटनेनंतर जपानच्या हवामान एजन्सीने तातडीने ईशान्येकडील किनारपट्टी भागासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
3 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भूकंपामुळे इमारती हादरल्या, रेल्वे सेवा थांबल्या आणि वीज आणि पाणीपुरवठा देखील खंडीत झाला असल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये अद्याप कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाचे केंद्र मिसावा शहरापासून 73 किलोमीटर पूर्व-ईशान्येस 53.1 किलोमीटर खोलीवर होते. या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Summery
जपान हादरलं
जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप
त्सुनामीचा इशारा जारी
