देश-विदेश
Donald Trump: अमेरिकेने भारतासह 75 देशांवरील टॅरिफला दिला तुर्तास ब्रेक
अमेरिका आणि चीनमधला व्यापारातील संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे.
अमेरिका आणि चीनमधला व्यापारातील संघर्ष वाढताना पाहायला मिळत असतानाच अमेरिकेने चीनवर 104 टक्के आयात कर लावला आहे. याच्याआधी देखील अमेरिकेने चीनवर 34 टक्के आयात कर लावला होता.
अमेरिकेने चीनवर लादलेल्या 34 टक्के आयात शुल्कानंतर चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर 34 टक्के आयात शुल्क लावण्याच्या निर्णय घेतला होता. यातच आता चीन यांच्यात टॅरिफ वॉर सुरु झालेले असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवरील आयात शुल्क 90 दिवसांसाठी थांबवले असल्याची माहिती मिळत आहे.
सर्व जागतिक आयातींवर त्यांचा 10% कर कायम ठेवला आहे. मात्र, चिनी आयातीवरील कर दर 150 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे.
