Hong Kong Fire
Hong Kong Fire

Hong Kong Fire : हाँगकाँगमध्ये सात इमारतींना भीषण आग; 44 जणांचा मृत्यू

हाँगकाँगमध्ये सात इमारतींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Hong Kong Fire) हाँगकाँगमध्ये सात इमारतींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून काही जण जखमी आणि काहीजण आत अडकल्याची देखील माहिती आहे. तर 300 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी नऊ जणांना मृत घोषित करण्यात आले आणि रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या इतर चार जणांना नंतर मृत घोषित करण्यात आले. काही लोक इमारतींमध्ये अडकल्याची शक्यता आहे.सध्या या आगीच्या घटनेचा तपास सुरू आहे.

बचाव कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव पथके तैनात करण्यात आली असून आग लागलेल्या परिसरात गोंधळ, नागरिकांची आरडाओरड सुरू होती.

Summery

  • हाँगकाँगमधील सात बहुमजली इमारतींना भीषण आग लागली

  • त्यात 44 जणांचा मृत्यू झाला

  • ज्वाला किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com