Indian Soldier : आताची मोठी बातमी! BSF जवानाला पाठवण्यास पाकिस्तानचा नकार

पहलगाम हल्ल्यानंतर BSF जवान सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या ताब्यात गेला या सैनिकाला परत पाठवण्यास पाकिस्तान नकार देत आहे.
Published by :
Prachi Nate

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा एक महत्त्वाची घडामोडी घडली. सीमा सुरक्षा बलाचा एक सैनिक सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.

अस असताना या सैनिकाला परत आणण्यासाठी बीएसएफ अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानी रेंजर्ससोबत ध्वज बैठका घेतल्या आहेत. असे असूनही, पाकिस्तान सतत टाळाटाळ करत आहे आणि सैनिकाला सोपवण्यास नकार देत आहे. चुकून सीमा ओलांडलेल्या बीएसएफ जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी अद्याप परत केलेले नाही.

या घटनेला 80 तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे, परंतु सैनिकाच्या परतीबाबत पाकिस्तानकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, पश्चिम बंगालमधील या सैनिकाचे कुटुंब अत्यंत चिंतेत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com