Laxmi Pujan 2024 : लक्ष्मीपूजनाची तारीख आणि मुहूर्त कोणता? जाणून घ्या
पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण
हिंदू धर्मात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. तर यात महत्त्वाचा दिवस म्हणून लक्ष्मीपूजन देखील आहे. या दिवशी गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. घरात सुख-समृद्धी नांदते आणि आर्थिक समस्या दूर होतात. यंदा आश्विन अमावस्येची तारीख दोन दिवसांवर येत असल्याने यावर्षी अनेक जणांमध्ये लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर आहे की, १ नोव्हेंबरला असा गोंधळ उडत आहे. हाच गोंधळ दूर करण्यासाठी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी लक्ष्मीपूजनाची तारीख आणि मुहूर्त कोणता हे सांगितले आहे.
लक्ष्मीपूजन कधी करायचं 31 ऑक्टोबरला की 1 नोव्हेंबरला अशी चर्चा सुरु आहे. दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या असेल तर दुस-यादिवशी लक्ष्मी-कुबेरपूजन करायचं असं धर्मशास्त्रीय ग्रंथात दिले आहे. धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात लिहलेल आहे, दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या असेल तर दुस-यादिवशी लक्ष्मी-कुबेरपूजन करायचं आणि त्याप्रमाणे यावर्षी शुक्रवार 1 नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळात म्हणजे सायंकाळी 6-4 पासून रात्री 8-35 पर्यंत प्रदोषकाळात लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. 1962, 1963 आणि 2013मध्येही दोन दिवस प्रदोषकाळात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुस-या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले होते, तसचं यावर्षी देखील लक्ष्मी-कुबेर पूजन करायचे आहे.