रविवारी कोकण रेल्वे मार्गावरील आठ गाड्या रद्द

रविवारी कोकण रेल्वे मार्गावरील आठ गाड्या रद्द

Published by :
Published on

दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावर मडगावजवळ पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी कोकण मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊन प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागणार असे सांगण्यात आले आहे. दक्षिण रेल्वे मार्गावर मडगावनजीकच्या-चांडोर- गोवा-मडगाव जंक्शन या मार्गावर कामासाठी 10 ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रद्द झालेल्या गाड्या

  • 1 तिरूपती-हैद्राबाद
  • 2 वास्को द गामा एक्सप्रेस
  • 3 पुणे-एर्नाकुलम
  • 4 एर्नाकुलम-पुणे
  • 5 रत्नागिरी- मडगाव
  • 6 मडगाव-रत्नागिरी
  • 7 मंगळूर-मडगाव
  • 8 मडगाव- मंगळूर

या 8 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-मडगाव गाडी करमाळीपर्यंतच धावणार आहे. सीएसएमटी मुंबई-मडगाव गाडी सावंतवाडीरोड ते मडगावदरम्यान 2 तास थांबवण्यात येणार आहे. सावंतवाडीरोड-मडगाव गाडीला 45 मिनिटे थांबा देण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com