मंदीराची दान पेटी हलविल्याच्या संशयावरुन वृद्ध महिलेला मारहाण

मंदीराची दान पेटी हलविल्याच्या संशयावरुन वृद्ध महिलेला मारहाण

Published by :
Published on

सूरेश काटे, कल्याण – डोंबिवली | मंदीराची दान पेटी हलविल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीने वृद्ध महिलेला शिविगाळ केली.वृद्ध महिलेने याचा जाब विचारला असता या इसमाने चक्क सिमेंटचा पत्र्याने  या वृद्ध महिलेला मारहाण केली.हा सर्व प्रकरणाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सुरज मिरजकर या मारहाण करणाऱ्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील जोशी बाग परिसरात सुरज मिरजकर आणि 60 वर्षीय वृद्ध महिला गीता उतेकर राहतात.शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास  सुरज मिरजकर याने घराशेजारी असलेल्या मंदिरातील दानपेटी हलवल्याच्या संशयातून गीता याना शिवीगाळ केली.गीता यांनी याचा जाब विचारला असता सुरजने गीता यांच्या डोक्यात सिमेंटच्या पत्र्याने मारहाण केली. दरम्यान या मारहाणीत वृद्ध महिलेच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात सुरज मिरजकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com