अभिनेता रजत बेदी विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

अभिनेता रजत बेदी विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

Published by :
Published on

कोई मिल गया फेम अभिनेता रजत बेदीच्या विरोधात मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीला रजतच्या कारने धडक दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एएनआयच्या वृत्तानुसार अभिनेता रजत बेदीने कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीला कूपर रुग्णालयात नेलं असून त्यावर उपचार सुरु आहेत.


रजतने जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांना त्या व्यक्तीचा पूर्ण उपचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. वृत्तानुसार ही व्यक्ती दारुच्या नशेत रस्ता ओलांडत असताना रजतच्या कारची धडक बसल्याने ती जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने सांगितले, " ही घटना सकाळी साडे सहा वाजता घडली. यावेळी माझे पती कामावरून घरी परतत होते आणि ते दारू प्यायले होते. जेव्हा ते रस्ता ओलांडत होते तेव्हा रजतच्या गाडीने त्यांना धडक दिली. यात ते जखमी झाले."

तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रजत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसंच कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सरु आहेत. या व्यक्तीला काही झाल्यास त्यासाठी रजत जबाबदार असेल असा आरोप या जखमी व्यक्तीच्या पत्नीने केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com