गर्दीत धावत येऊन चाहत्याने धरला तमन्नाचा हात, पुढे काय झालं...; पाहा व्हिडीओ

गर्दीत धावत येऊन चाहत्याने धरला तमन्नाचा हात, पुढे काय झालं...; पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या सौंदर्याचे तर लाखो चाहते आहेत. तमन्नाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. तमन्ना एखाद्या कार्यक्रमात पोहोचली की, तिच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. मात्र यावेळी तिला एका वेगळ्याच प्रसंगाला सामोर जावं लागलं.

केरळामध्ये एका कार्यक्रमासाठी तमन्ना गेली होती. या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने केलेलं कृत्य पाहून तीही गोंधळली. मात्र तमन्नाने समजुतदारपणे संपूर्ण प्रकार हातळला. या कार्यक्रमात तमन्ना मंचावरुन खाली उतरत होती. तिचे सुरक्षारक्षकही तिच्याबरोबर होते. सोशल मीडियावर तमन्नाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

सुरक्षारक्षक असतानाही एक चाहता तमन्नाला भेटण्यासाठी जबरदस्ती तिच्या जवळ आला. तिच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान तमन्नाचे सुरक्षारक्षक त्याला बाजूला करत होते. मात्र तो चाहता काही ऐकला नाही. यावेळी तमन्नाचे पुढाकार घेत चाहत्याला तिच्याजवळ येऊ दिलं. तिने समजुतरापणाने चाहत्याचा आदर करत त्याच्याबरोबर फोटो काढला.

विशेष म्हणजे तमन्नाने चाहत्याला दिलेल्या वागणूकीचं सर्वत्र कौतुक होत आहे. रजनीकांत यांच्यासह तमन्ना ‘जेलर’ चित्रपटात काम करताना दिसेल. हा चित्रपट येत्या १० ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com