‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यानंतर आता केदार शिंदे यांचा 'आईपण भारी देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केदार शिंदे यांनी या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. या चित्रपटात नेमकं कोणते कलाकार असणार, चित्रपट कधी प्रदर्शित होणार. याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही आहे.

केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. ही पोस्ट शेअर करत केदार शिंदे म्हणाले की, प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट 'आईपण भारी देवा' असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com