Bollywood
BollywoodTeam Lokshahi

आमिर अन् अक्षयच्या चित्रपटांना कमाईचा फटका

Published by :

2022 हे वर्ष बॉलीवूडला काही खास सिद्ध करणारे नाही. कोरोना काळात बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री पुन्हा रुळावर येण्यात अपयशी ठरली आहे. काही चित्रपट सोडले तर बिग बजेट चित्रपटांनाही प्रेक्षकांनी नाकारलेलं आहे. एकाच दिवशी लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन या वर्षातील दोन मोठे चित्रपट एकदाच भिडले आहेत. बॉक्स ऑफिसच्या क्लेशनंतर आता ही चित्रपटं ऑनलाइन लीक झाली असून निर्मात्यांचं यापेक्षा मोठं नुकसान काय असू शकतं.

खरं तर आमिर खान(Aamir Khan)यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट लाल सिंग चड्ढा आणि दुसरीकडे अक्षय कुमार(Akshay Kumar)यांचा रक्षाबंधन या एकदिवसीय रिलीज होणाऱ्या चित्रपटाची चर्चा खूप होती. हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले. पहिल्या दिवसाच्या हिशोबाने दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन जास्त नसले तरी रिपोर्ट्सनुसार आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन 10.75 कोटी होते तर दुसरीकडे रक्षा बंधन या चित्रपटाने फक्त 7 कोटींची कमाई केली होती. यानंतर आता आणखी एक बातमी समोर आली आहे जी चित्रपट निर्मात्यांचे नुकसान वाढवण्यात भर घालू शकते. काही वृत्तानुसार दोन्ही चित्रपट ऑनलाइन लीक झाले आहेत. अनेक पायरेटेड साइटवरून ते वेगाने डाउनलोड केले जात आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की जो चित्रपट कमी रक्कम जमा करू शकला असता तो लीकमुळे थांबू शकतो.

लालसिंग चड्ढा या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला.
गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. आमिर खानचे जुने व्हिडिओ शेअर करताना त्याला ट्रोल केले जात आहे. दुसरीकडे बॉयकॉटच्या बाबतीत लोकांनी अक्षय कुमारच्या रक्षाबंधनालाही सोडलेलं नाही. आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं महत्वाचं ठरू शकतं. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसले आहेत. दुसरीकडे अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा रक्षाबंधन या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com