Happy Patel Song
AAMIR KHAN PRODUCTIONS RELEASES ROMANTIC SONG CHANTA TERA FROM HAPPY PATEL

Happy Patel Song: आमिर खान प्रोडक्शन्सने रिलीज केला ‘हॅप्पी पटेल’चा जबरदस्त रोमँटिक साँग

Aamir Khan Productions: आमिर खान प्रोडक्शन्सने ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’मधील रोमँटिक गाणं ‘चांटा तेरा’ रिलीज केलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आमिर खान प्रोडक्शन्सने आपल्या येऊ घातलेल्या आणि सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या चित्रपट ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ चा नवीन गाणं ‘चांटा तेरा’ रिलीज झाले आहे. वीर दास आणि मिथिला पालकर यांच्यावर चित्रित केलेलं हे हटके डुएट त्याच्या मजेदार आणि वेगळ्या अंदाजामुळे चित्रपटाच्या मूडशी पूर्णपणे जुळून जातं.

सामान्यपणे बॉलिवूडमधील लव्ह सॉन्ग्समध्ये मोठमोठी नाट्यमय दृश्यं आणि संवाद असतात, पण ‘चांटा तेरा’ त्यापेक्षा अगदी वेगळं आहे. हे गाणं प्रेमाला अगदी साध्या, ओळखीच्या आणि सोप्या रूपात दाखवतं. सुंदररीत्या चित्रित केलेलं हे गाणं छोटय़ा-छोटय़ा भावना, हलकीफुलकी नोकझोक आणि साधेपणातील प्रेमाला पकडतं, त्यामुळे हे गाणं पाहायलाही खूप आनंददायक वाटतं. वीर दास आणि मिथिला पालकर यांच्यातील केमिस्ट्री नैसर्गिक भासते, ज्यामुळे गाण्याला आपुलकीची आणि उबदार छटा मिळते.

हे गाणं आयपी सिंग आणि नुपूर खेडकर यांनी गायलं असून त्यांचे आवाज एकमेकांना अप्रतिमरीत्या साथ देतात. ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर मजामस्तीला एका नव्या पातळीवर नेतो. भरपूर कॉमेडीने भरलेला हा ट्रेलर अनेक मजेदार आणि हटके क्षणांनी परिपूर्ण आहे, जे एका पूर्णपणे एंटरटेनिंग चित्रपटाचं वचन देतात. दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिकांत वीर दास आपली खास खोडकर कॉमेडी घेऊन आले आहेत, जी प्रेक्षकांना मनसोक्त हसवणार आहे. ऊर्जा, चार्म आणि युथफुल वाइबने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाच्या रिलीजबद्दलचं उत्साह आणखी वाढवतो.

आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘हॅप्पी पटेल’चं दिग्दर्शन वीर दास यांनी केलं आहे. चित्रपटात मोना सिंग, शारिब हाशमी आणि मिथिला पालकर महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com