अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Admin

अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सर्वजणांना गणपतीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. अभिनेता अभिनय बेर्डेसुद्धा यात मागे नाही आहे. मी देखील बाप्पाचा ‘नंबर वन फॅन’ असल्याचं सांगत बाप्पाच्या स्वागताच्या जल्लोषात तो सहभागी झाला आहे. ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. असलेला हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

‘बिग बॉस 15’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता अभिनव बेर्डे यांची फ्रेश जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शन, वेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मीती केली आहे. तर ‘यूएफओ सिने मिडिया नेटवर्क’ या चित्रपटाचे वितरक पार्टनर आहेत. व्यवसाय प्रमुख शौमिल शहा आहेत.

या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनव म्हणतो की, अभिनय सांगतो की, ‘बाप्पाचं आगमन’ सगळयांनाच आनंद देणार असतं. हाच आनंद आणि उत्साह तुम्हाला या गाण्यात पहायला मिळेल. मला स्वत:ला गणपतीचं हे गाणं करताना खूप मजा आली. ‘बाप्पा’ हा सर्वांसाठीच नंबर वन’ असतो. यंदाच्या गणपतीत हे गाणं कल्ला करेल.

अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'रंग दे' म्युझिक अल्बम रसिकांच्या भेटीला
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com