Anupam Kher :अभिनेते अनुपम खेर महाकुंभमेळात सामील प्रयागराज येथे केले स्नान

Anupam Kher :अभिनेते अनुपम खेर महाकुंभमेळात सामील प्रयागराज येथे केले स्नान

महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले अनुपम खेर यांनी प्रयागराज गंगेत स्नान केले. त्यांच्या पोस्टने चाहत्यांना भावूक केले आहे. वाचा अधिक माहिती!
Published by :
Team Lokshahi
Published on

महाकुंभ हा हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थयात्रेतील सर्वात महत्त्वाचा मेळा. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील पवित्र स्थानावर १३ जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी हा एक उत्सव असल्याच म्हटलं जात. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या कुंभमेळामध्ये ९ कोटी पेक्षा जास्त भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.

या महाकुंभमेळ्यामध्ये नेत्यांसह अभिनेत्यांनी सहभाग घेतला आहे. त्यातील एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सहभागी झाले आहे. ते प्रयागराज गंगेमध्ये स्नान करतानाची पोस्ट अधिकृत सोशलमीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर असे लिहीतात की, "महाकुंभात गंगेत स्नान करून जीवन सफल झाले आहे. गंगा, जमुना आणि सरस्वती माता जिथे पहिल्यांदा भेटतात तिथे पोहोचलो. प्रार्थना करताना डोळ्यांतून अश्रू वाहू लागले हा योगायोग बघा बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठादिनी असाच प्रकार घडला होता सनातन धर्माचा विजय". चाहत्यांनी या पोस्टवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com