Mahesh Kothare : "भाजप म्हणजे आपलं घर, मी स्वत: भाजपचा भक्त..."; अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारेंचं विधान चर्चेत
थोडक्यात
अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारेंचं विधान चर्चेत
"भाजप म्हणजे आपलं घर"
"मी स्वत: भाजपचा भक्त आहे आणि मोदीजींचा भक्त"
(Mahesh Kothare) मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असून यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
यातच अभिनेते महेश कोठारे यांनी केलेले वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे म्हणाले की, " भाजप म्हणजे आपलं घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे आणि मोदीजींचा भक्त आहे."
"16 व्या वर्षाचे जे आपलं दिवाळी सेलीब्रेशन असेल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल, याची मला खात्री आहे." या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेत आले असून त्यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.